आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रज्ञाशोध परीक्षा:पाचवीचा 23.90 % तर आठवीचा 12.53 % निकाल, 29 हजार 171 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यासाठी दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) घेतली जाते.

गेल्या वर्षी 31 जुलै 2022 ला घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल अखेर जाहीर झाला असून यात पात्र विद्यार्थी संख्येनुसार पाचवीचा 23.90 टक्के तर आठवीचा 12.53 टक्के असा एकूण 19.10 टक्के निकाल लागला आहे. तर नाशिकसह राज्यभरातून 29 हजार 171 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

परीक्षा परिषदेतर्फे गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेचा अंतरिम निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला. या परीक्षेस पाचवीचे 23.90 टक्के तर आठवीचे 12.54 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुणपडताळणीनंतर अंतरिम निकालच अंतिम ठरला आहे. नाशिक जिल्ह्यात पाचवीसाठी 20 हजार 922 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 19 हजार 445 विद्यार्थी परीक्षेला हजर होते.

आठवीसाठी 17 हजार 564 विद्यार्थ्यांपैकी 16 हजार 403 विद्यार्थी परीक्षेला हजर राहिले. एकूण 38 हजार 486 पैकी 35 हजार 848 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला उपस्थित होते. नाशिकमध्ये इयत्ता पाचवीसाठी 833 तर आठवीसाठी 765 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची नोंदणी

अंतिम निकाल जाहीर झाला असून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या www.mscepune.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र प्रथमच कोविडनंतर पुन्हा एकदा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यंदा दहा हजार विद्यार्थ्यांची भर पडली असून पाचवीसाठी 26 हजार 972 तर आठवीसाठी 21 हजार 541 असे एकूण 48 हजार 513 विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेत. येत्या 12 फेब्रुवारी 2023 ला परीक्षा होणार आहेत.

अशी मिळते शिष्यवृत्ती

शिष्यवृत्तीसाठी इयत्ता पाचवीच्या परीक्षेतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत दरवर्षी 1 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. तर इयत्ता आठवीच्या परीक्षेतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत वार्षिक 1500 रुपये शिष्यवृत्तीच्या माध्यमातून दिले जातात. शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक त्यांच्या बँक खात्याची व आधार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय डाऊनलोड करता येणार नाही. परंतु, संकेतस्थळावरील गुणवत्ता यादीत त्याला स्वतचा शिष्यवृत्ती संच प्रकार पाहता येईल.

बातम्या आणखी आहेत...