आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर घर तिरंगा:स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवाची तयारी; सव्वादाेन काेटी तिरंग्यांसाठी प्रयत्न, 11 ते 17 ऑगस्ट स्वराज्य सप्ताह

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त महाराष्ट्रात 'हर घर तिरंगा' हा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात सर्व घरांमध्ये तिरंगा फडकवला जाण्याचे नियोजन करण्यात येत असून, यादृष्टीने सांस्कृतिक कार्यविभाग तयारी करत आहे. त्यासाठी दोन कोटी तिरंग्याची आवश्यकता असणार आहे, त्यामुळे संविधानाचे नियम पाळून याबाबतची सर्व तयारी करण्यात यावी अशी सुचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोअर समितीची बैठक मंगळवारी (दि.14) मंत्रालयात पार पडली. यावेळी कामगार मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक‍ न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्यासह मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्यासह संबंधित सचिव उपस्थित होते.

असा असेल कार्यक्रम

येत्या 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये स्वराज्य सप्ताह आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत असून यामध्ये चार स्तरावर कार्यवाही करण्यात येईल. राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर आणि वार्ड किंवा ग्रामस्तरीय स्तरावर लोकसहभागातून कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून, हे कार्यक्रम नेमके कोणते असावे, या कार्यक्रमांमध्ये कोणत्या बाबींचा समावेश असावा, कार्यक्रमाची रुपरेषा कशी असावी, प्रत्येक स्तरावर तो कार्यक्रम वेगळा कसा असेल याबाबतचे नियोजन पुढील बैठकीत सादर करावे अशा सूचना देशमुख यांनी दिल्या आहेत.

2 विशेष कार्यक्रम

  • येत्या 15 ऑगस्टला मरीन ड्राईव्ह येथे भारताची गेल्या 78 वर्षांतील प्रगती यावर आधारीत एक विशेष लेझर शो दाखवण्यात येईल.
  • 9 ऑगस्टला दोन्ही सभागृहांचे सदस्य यांच्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांना एकत्र घेऊन एका विशेष कार्यक्रम आयोजन करतील.

सर्वसमावेशक व्हावा

कृषीबरोबरच कामगार आणि उद्योगक्षेत्राची प्रगती यांचाही समावेश या आजादी का अमृत महोत्सवात केला जावा. स्थानिक कलाकारांचा समावेश व्हावा, अशा सूचना कामगार मुश्रीफ यांनी दिल्या. तर आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, जिल्हयांमध्ये आरोग्य अभियान राबवण्यावर भर देण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या मुख्य दोन योजनांचा समावेशही आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमामध्ये करण्यात याव्यात अशा सूचना मुंडे यांनी केल्या. केदार म्हणाले की, या उपक्रमाअंतर्गत महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी सेवाग्राम आश्रम येथे शिक्षण विभागाच्या मदतीने चर्चासत्रे आयोजित करण्यात यावी.

बातम्या आणखी आहेत...