आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:नगर परिषदा, नगरपंचायत निवडणुकांची तयारी सुरू; प्रारूप प्रभाग रचनांना प्रारंभ, शंभरहून अधिक शहरांत निवडणुका

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे निवडणुका स्थगित झाल्याने गेल्या वर्षी मुदत संपलेल्या तसेच डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान मुदत संपत असलेल्या राज्यातील शंभरहून अधिक नगर परिषदा व नगरपंचायतींमधील निवडणुकांचे अप्रत्यक्ष बिगुल फुंकले गेले आहे. या शहरांतील प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने सुरू झाले आहे. भाजप सरकारच्या काळातील ४ सदस्यीय प्रभाग रचना रद्द करून आघाडी सरकारने एकसदस्यीय प्रभागांचा निर्णय घेतल्याने या राजकीय समीकरणांना कलाटणी देणाऱ्या या निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत.

कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे मुदत संपलेल्या शंभरहून अधिक नगर परिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित झाल्या होत्या. काही संस्थांवर प्रशासकीय कारभार सुरू आहे. काही संस्थांची मुदत डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान संपत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने या शहरांमधील प्रभाग रचनांचे कच्चे आराखडे तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. काही ठिकाणी रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांही याच टप्प्यात होणार आहेत.

असे तयार हाेताहेत प्रारूप प्रभाग
{ गुगल अर्थ नकाशाच्या माध्यमातून ठरणार प्रभाग { सन २०११ च्या जनगणनेतील आकडेवारीचा आधार { गेल्या पाच वर्षांत प्रभागांच्या हद्दीत झालेले बदल { पाथटूलद्वारे नैसर्गिक सीमांचे निश्चितीकरण { नवीन रस्ते, पूल, इमारती हे भौगोलिक बदल

या ठिकाणी होणार निवडणुका
{बीड : केज, नांदेड : भोकर, उस्मानाबाद : लोहारा {नगर : शिर्डी, राहता, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, पाथर्डी, कोपरगाव, देवळाली-प्रवरा, नेवासा {सोलापूर : मोहोळ, माढा, माळशिरस {पुणे : राजगुरूनगर {नाशिक : सिन्नर, भगूर, मनमाड, नांदगाव, सटाणा, येवला {जळगाव : भडगाव, वरणगाव, चाळीसगाव, पाचाेरा, अमळनेर, पाराेळा, चाेपडा, एरंडाेल, धरणगाव, भुसावळ, यावल, रावेर, फैजपूर, सावदा, बाेदवड, नशिराबाद {अमरावती : धारणी, { ठाणे : अंबरनाथ, कुळगाव - बदलापूर, { नागपूर : मोवाड, वाडी { सिंधुदुर्ग : कुडाळ, {सातारा : लोणंद

या ठिकाणी पोटनिवडणुका : रायगड : तळा {रत्नागिरी : रत्नागिरी { कोल्हापूर : शिरोळ { यवतमाळ : राळेगाव, पुसद { नागपूर : काटोल, भिवापूर {चंद्रपूर : बल्लारपूर

बातम्या आणखी आहेत...