आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदेश:स्वतःच्या व्यवसायासाठी तयारी करा; मराठा खान्देश मंडळाच्या गुणगाैरव समारंभामध्ये युवकांना संदेश

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पर्धात्मक युगात मुलांनी नोकरीच्या मागे न पडता स्वतःचा उद्योगधंदा सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी केली पाहिजे. येणाऱ्या काळात कोणत्या क्षेत्रात संधी उपलब्ध होत आहेत याचा नीट अभ्यास करून करिअरकरता क्षेत्र निवडले पाहिजे, असा संदेश खान्देश मराठा मंडळातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात युवकांना दिला गेला. विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या आईंचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील यांनी युवकांना मार्गदर्शन करतांना हा संदेश दिला. व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील, सेक्रेटरी अविनाश पाटील ,उपाध्यक्ष सुधाकर सिसोदे ,खजिनदार अशोक पाटील, सहसचिव बी. आर. पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनीता पाटील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...