आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्निशमन केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव:दक्षता आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रस्ताव तयार; काॅलेजराेडसह गांधीनगर, दसकला अग्निशमन केंद्र

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराची लोकसंख्या २० लाखापार झाली असताना किंबहुना दिवसागणिक नवीन घरांची वाढ भर पडून सद्यस्थितीमध्ये पाच लाखाहून अधिक निवासी व्यावसायिक मिळकती झाल्याचे बघून महापालिकेने आता अग्निसुरक्षा किंबहुना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी गांधीनगर, कॉलेजरोड व दसक येथे नवीन अग्निशमन केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये आगीच्या घटना वाढत असून अपुरे मनुष्यबळ तसेच साधन सुविधांचा अभाव त्यामुळे आग विझवता विझवता महापालिकेची दमछाक होत आहे. शहराचा वाढता विस्तार बघता अग्निशामक केंद्रांची संख्या अपुरी असून शहराच्या दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचणे अवघड होत आहे. सध्या, शहरात शिंगाडा तलाव येथे मुख्य अग्निशमन केंद्र असून सिडकोतील गणेश चौक, सातपूर औद्योगिक वसाहत, नाशिकरोड, के. के. वाघ महाविद्यालय येथे अग्निशमन केंद्रे आहेत. मात्र आता, तीन नवीन केंद्रांची निर्मिती केली जाणार असून नाशिकरोड व द्वारकाच्या मधोमध मोठ्या प्रमाणात वस्ती झाल्याने गांधीनगर या मध्यवर्ती ठिकाणी अग्निशमन केंद्र उभारले जाणार आहे. कॉलेजरोड व गंगापूररोड हा भाग व्यापण्यासाठी या भागात अग्निशमन केंद्र प्रस्तावित आहे. नांदूरनाका, जेलरोड परिसरात मोठ्या प्रमाणात नागरि वसाहत वाढल्याने दसक भागात अग्निशमन केंद्र प्रस्तावित केले जाणार आहे, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी दिली. या केंद्रांमुळे आपत्कालीन स्थितीचा सामना करता येणार आहे.

अग्निशमन विभागात २०९ फायरमन पदे रिक्त
महापालिकेच्या अग्निशमन विभागात मंजूर आस्थापनेचा विचार करता २०९ जागा रिक्त आहेत. पालिकेकडे २७ अग्निशमन वाहने आहेत तर ९० फायरमन कार्यरत आहेत.

बातम्या आणखी आहेत...