आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:संपादरम्यान अखंडित वीज देण्यासाठी सज्जता

नाशिकरोडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरण कंपनीच्या भांडूप परिमंडलातील कार्यक्षेत्रात अदानी इलेक्ट्रिकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेल्या परवान्याच्या विरोधात राज्याच्या वीज कामगार संघटनांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून ४ ते ६ जानेवारी या तीन दिवसांच्या पुकारलेल्या संपकाळात राज्यात अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रशासनाने देखील तयारी केली आहे.

कंपनीने ठरवून दिलेली कामे न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. रजेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. संपकाळात वीजपुरवठा अखंडित व नियमित ठेवण्यासाठी महावितरणने नियुक्त केलेल्या एजन्सीचे कामगार, कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त झालेले अभियंता व कर्मचारी यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक व महाऊर्जा या विभागातील अभियंत्यांना या संपकाळात उपकेंद्राच्या ठिकाणी नेमण्यात येणार आहे. महावितरणतर्फे नियुक्त ज्या एजन्सी या संपकाळात काम करणार नाहीत अशा एजन्सींना तत्काळ बडतर्फ करण्यात येणार आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक साहित्याची व्यवस्था केली आहे.

२४ तास नियंत्रण कक्ष
वीज पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडळ व मंडल कार्यालयाच्या ठिकाणी संनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून हे नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...