आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामिशन नवाेदय या उपक्रमांतर्गत सुरगाणा तालुक्याने उंच भरारी घेत दिल्ली दरबारी झेंडा राेवला. बुधवारी दिल्लीतील आयएएस अकादमीत पीएम ॲवार्डसाठी सादरीकरण करण्यात आले. यात निश्चित यश मिळण्याची आशा आहे. हे सादरीकरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी स्वत: केले.
विद्यार्थ्यांच्या बाैद्धिक गुणांना वाव मिळावा, यासाठी मिशन नवाेदय हा उपक्रम जिल्ह्यात सहा सात वर्षापासून राबवण्यात येत आहेत. यात अतिमागास असलेल्या सुरगाणा तालुक्याने पहिल्या वर्षापासून आघाडी घेतली हाेती. तालुक्यातील सूर्यगड येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक अजय निटुरे व उंबरठाण जिल्हा परिषद शाळेचे सतीश इंगळे यांनी मेहनत घेत विद्यार्थ्यांना घडवण्यात माेलाचे याेगदान दिले आहेत.
पीएम ॲवार्ड या उपक्रमांतर्गत सादरीकरण करण्यासाठी प्रत्येक राज्यातील शिक्षक व अधिकारी सहभागी झाले हाेते. सुरगाणा तालुका या उपक्रमात जिल्ह्यात प्रथम आला हाेता. त्यानंतर विभाग स्तरावर ऑनलाईन सादरीकरण करण्यात आले. या ठिकाणीही तालुक्याने प्रथम क्रमांक मिळविला. राज्यस्तरीय सादरीकरणातही सुरगाण्याने प्रथम क्रमांक मिळविल्यामुळे देशपातळीवर निवड झाली हाेती. बुधवारी (दि. १) दिल्लीतील महाराष्ट्र सदन जवळील आयएएस अकादमीत सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांसमाेर सादरीकरण झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सादरीकरण केले. त्यांना उपशिक्षणाधिकारी धनंजय काेळी व शिक्षण विस्तार अधिकारी तथा मिशन नवाेदयचे समन्वयक भाऊसाहेब सरक यांनी सहकार्य केले.
सूर्यगड शाळेचे यश
2016 मध्ये 2, 2017 मध्ये 2, 2018 मध्ये 1, 2019 मध्ये 2, 2020 मध्ये 7, 2021 मध्ये 3, 2022 मध्ये 4 विद्यार्थी नवोदय परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
उंबरठाण शाळेचे यश
2020 मध्ये 3,2021 मध्ये 5 तर 2022 मध्ये 3 विद्यार्थी नवोदय परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे.
या शाळांचेही योगदान
तालुक्यातील सूर्यगड व उंबरठाण शाळेसह आंबाठा, पळसन, डोल्हारे, बा-हे, माणी, मनखेड, उंबरदे, देवलदरी, खुंटविहीर शाळेतील आजपर्यंत एकूण 66 विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. गटविकास अधिकारी दीपक पाटील, गटशिक्षणाधिकारी लता भरसट, विस्तार अधिकारी संजय कुसाळकर, दिलीप नाईकवाडे, नेहा शिरोरे, नरेंद्र कचवे, प्रमिला शेंडगे, बाबुराव महाले यांचेही मिशनसाठी योगदान आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.