आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रपती पदासाठी येत्या 18 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. त्यापुर्वी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठे विधान केले आहे. राष्ट्रवादीचे सर्वसर्वे शरद पवार हे राष्ट्रपती झाले तर आनंदाची गोष्ट असून महाराष्ट्राकरिता गर्वाची बाब राहील. अशी इच्छा भुजबळांनी व्यक्त केली आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे यांना ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात आमंत्रण दिले आहे. यावेळी राष्ट्रपती पदाकरिता उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव सुचविले जाणार असल्याची माहिती आहे. ममता बॅनर्जीनीं सर्व विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले आहे. त्यांच्या सोबत मीटिंग घेऊन राष्ट्रपतीपदासाठी कोणाला करावे, यावर चर्चा करण्यात येणार आहे असल्याचे भुजबळ म्हणाले.
ममतांनी बोलावली बैठक
येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपती निवडणुक होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मजबूत आणि प्रभावी विरोधासाठी पुढाकार घेतला असून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यासाठी ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या 22 नेत्यांसह आणखी 8 विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून 15 जून रोजी होणाऱ्या संयुक्त बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कॉन्स्टिट्यूशन क्लब दिल्ली येथे ही बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात शरद पवारांना देखील या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले असून, पवार 15 जूनला दिल्लीच्या बैठकीत हजर राहणार आहेत.
मल्लिकार्जुन खर्गेंनी उमेदवारीची शक्यता
शुक्रवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि DMK, CPI, CPI(M) आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांशी चर्चा केली. वृत्तानुसार, या संभाषणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांसाठी समान उमेदवार उभे करण्याबाबत चर्चा केली. खरगे यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याशीही या मुद्द्यावर फोनवरून चर्चा केली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे गैरहजर राहणार
ममतांनी बोलावलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर राहणार आहेत. अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिली आहे. तसेच शिवसेनेचा एखादा नेता त्या बैठकीला हजर राहिल अशी माहिती राऊतांनी दिली. येत्या 15 जूनला आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह आणखी कार्यकर्ते अयोध्येला जाणार आहेत. त्यासाठी आता शिवसेना ममतांच्या दिल्लीतील बैठकीसाठी कुणाला संधी देते हे पाहावे लागणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.