आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन:मुकादम साहित्य परिषदेचे अध्यक्ष ; 28 व 29 जानेवारी रोजी नाशिक येथे होणार सोहळा

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेच्या वतीने नाशिक शहरात २८ व २९ जानेवारी २०२३ रोजी ९ व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक अब्दुल कादर मुकादम यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती परिषदेतर्फे हसीब नदाफ व डॉ.युसूफ बेन्नूर यांनी दिली. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभा नगर, मुंबई नाका नाशिक येथे होणाऱ्या संमेलनात महाराष्ट्रातील किमान १००० साहित्यिक उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. यात ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत मुस्लिम: प्रश्न, वास्तव आणि अपेक्षा’, ‘मुस्लिम मराठी साहित्य चळवळीची ३ दशके : एक साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक विश्लेषण’, या विषयांवर वैचारिक मंथन होईल.

बातम्या आणखी आहेत...