आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळा पूर्वतयारी:रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण करण्यास द्या प्राधान्य; पालकमंत्र्यांचे मनपा प्रशासनास आदेश

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मान्सून पूर्वतयारी जिल्ह्यात सुरू झाली असली तरीही रुग्णालयात लागणाऱ्या आगी, कोरोना संसर्गाची संभाव्य शक्यता पाहता आपत्ती व्यवस्थापनाला अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. बिटको रुग्णालयात सिटी स्कॅन व एमआरआय मशीन सुसज्ज ठेवावे. अग्निशमन विभागाने सतर्कता ठेवावी. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महापालिका आयुक्तांनी शहरातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करावे, अशी सूचना दिल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले, पावसाळा सुरू झाला असून बचाव व मदतकार्यासाठी ‘एनडीआरएफ’ पथकासोबत काम करा. आणखी मदत हवी असल्यास लष्कराच्या पथकाशी संपर्कात रहा. अतिवृष्टीमुळे अनेक वृक्ष उन्मळून पडतात. आज वृक्ष कोसळून दोघांचा मृत्यू झाला. ते पाहता धोकेदायक वृक्ष असल्यास ते दूर करा जेणेकरुन दुर्घटना घडणार नाही, अशा सूचना त्यांनी महापालिकेला दिल्या. तसेच काही गावांना पुराचा फटका बसतो. ते पाहता बोटी सुसज्ज ठेवा. त्या नादुरुस्त असल्यास त्याची दुरुस्ती करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

धरणांतून विसर्ग हळूहळू वाढविण्यात यावा
पावसाळ्यात गोदेला पूरपरिस्थिती टाळण्यासाठी गंगापूर धरणातून जलसंचय पाहून पाणी सोडा. धरण पूर्ण भरण्याची वाट पाहू नका. अन्यथा अचानक पाणी सोडल्यावर पूर संकट येऊ शकते, अशा सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

बातम्या आणखी आहेत...