आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासावकारी कर्ज घेत असेल तर सावाधान व्हा! शहरात एका हाॅटेल व्यावसायीकाने 9 लाख रुपये व्याजने घेत सावकाराला तब्बल 50 लाख 90 हजार रुपये व्याज दिले मात्र तरी देखील या सावकाराने व्यावसायीकासह त्याच्या पत्नीला मुलीला अश्लिल शिविगाळ करत आणखी 20 लाखांची मागणी करत वारंवार जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सावकाराच्या विरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात सावकारी कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि सुरेश पुजारी (रा. राजीवनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते हाॅटेल व्यावसायीक आहे. हाॅटेल व्यवसायात अडचण आल्याने एका बँकेतून सेवानिवृत्त झालेले ओळखीचे विजय शंकरराव देशमुख (रा. कर्मयोगीनगर, गोवींदनगर) यांच्याकडून मुंबई नाका परिसरातील एका हाॅटलमध्ये 9 लाख रुपये 5 टक्के व्याजाने घेतले आहे.
2007 पासून ते 2022 पर्यंत 9 लाखांच्या रक्केमवर 44 लाख 90 हजार रुपये रोखीने व्याज दिले आहे. तसेच उर्वरीत 6 लाखांची रक्कम संशयित देशमुख यांच्या सांगण्यावरुन आरटीजीएस पद्धतीने तक्रारदार पुजारी यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन ट्रान्सफर केले आहे. असे 50 लाख 90 हजारांचे व्याज 16 वर्षापासून देत आहे.
व्यवसायात अडचण असल्याने व्याजाचे पैसे देण्यास असमर्थ असल्याने पुजारी यांनी व्याजाची रक्कम देण्यास नकार दिला. संशयित देशमुख यांनी पुजारी यांच्याकडे आणखी 20 लाखांची मागणी करत वारंवार फोन करत शिविगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. घरी येऊन मुलीला अश्लील भाषेत शिविगाळ केली. इंदिरानगर बोगदा येथे रस्त्यात अडवून पैशांची मागणी करत शिविगाळ केली.
पुजारी यांनी विनंती केली तरी देखील संशयित ऐकण्यास तयार नसल्याने पुजारी यांना पोलिसांत धाव संशयित सावकार देशमुख यांच्या विरोधात तक्रार दिली. निरिक्षक चंद्रकात आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.