आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसंत व्याख्यानमाला:सरकारी कंपन्यांचे खासगीकरण देशासाठी मारक : अॅड. तातेड

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारी कंपन्या आपल्या देशाची खरी संपत्ती आहे. अनेक सरकारी कंपन्यांचे वित्तीय भाग भांडवल लाखो कोटी रुपयांमध्ये आहे. हजारो कामगार त्यात काम करत आहे. मात्र सरकारी कंपन्यांचे, वित्तीय संस्थांचे हळूहळू खासगीकरण केले जात आहे. खासगीकरणाच्या धोरणामुळे देशातील आर्थिक सुरक्षेला प्राधान्य देण्याचे धोरण नष्ट होत आहे. सरकारी कंपन्या, आस्थापना, वित्तीय संस्था या आपल्या देशाची ताकद असून खासगीकरणाच्या धोरणाला विरोध करणे गरजेचे आहे, असे मत अॅड. कांतिलाल तातेड यांनी व्यक्त केले.

गोदाघाटावरील य. म. पटांगणावर आयोजित ९९ व्या नाशिक वसंत व्याख्यानमालेत डॉ. वसंतराव पवार स्मृती व्याख्यानातील ‘भारतीय वित्तीय संस्थानचे खासगीकरण जनतेच्या हिताचे आहे काय?’ या विषयावरील अॅड. तातेड यांनी आपले विचार व्यक्त करत गुंफले. यावेळी विद्युल्लता तातेड, अशोक तांबे, अनिल नहार, संगीता बेणी आदी उपस्थित होते. अॅड. तातेड म्हणाले की, एलआयसी विमा कंपनी ही सर्वात मोठी सरकारी वित्तीय संस्था आहे. देशाच्या विकासासाठी व सामाजिक सुरक्षेसाठी एलआयसीची स्थापना १९५६ साली करण्यात आली. जो पैसा खासगी विमा कंपन्या लुटत होत्या. तो पैसा एलआयसीत आला. अनेकांना यातून रोजगार मिळाला. महिलांना एजन्सी दिल्याने त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.

ठराविक मोठ्या उद्योजकांनी बँकांचे कर्ज बुडविले आहे. हे थांबविण्याचे काम जनतेला करावे लागेल. भूषण काळे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल महाजन यांनी डॉ. पवार यांच्या स्मृतींना उजाळा दिला. श्रीकांत येवले यांनी परिचय करून दिला.

बातम्या आणखी आहेत...