आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांच्या प्रश्नाला‎ विधिमंडळात उत्तर‎:दाेन्ही उड्डाणपूलांची प्रक्रिया‎ सुरूच ; नगरविकासची माहिती‎

नाशिक‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाच कोटींची किरकाेळ तरतूद‎ करून अडीचशे कोटी रुपये खर्चून‎ मायको सर्कल व त्रिमूर्ती चौक येथे‎ गरज नसतानाही घेतलेले उड्डाणपूल‎ रद्द झाले असे महापालिका कितीही‎ सांगत असली तरी प्रत्यक्षात मात्र‎ विधानसभेत माजी पालकमंत्री‎ छगन भुजबळ व राष्ट्रवादीचे‎ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रश्न‎ उपस्थित केल्यानंतर त्यात दोन्हीही‎ पूल रद्द केलेच नसल्याचे‎ नगरविकास खात्याने स्पष्ट केले.‎ निविदा अटी-शर्तीनुसार पुढील‎ कारवाई प्रगतीत आहे व काम सुरू‎ झाले नसल्यामुळे ठेकेदारांना‎ नोटीसही दिल्याचा दावा‎ नगरविकास खात्याने महापालिकेशी‎ चर्चा करून दिलेल्या उत्तरात‎ करण्यात आला आहे.‎ मायको सर्कल येथील उड्डाण‎ पुलाबाबत आयआयटी पवई यांच्या‎ तपासणी अहवालानुसार पुढील‎ कारवाई सुरू आहे तसेच त्रिमूर्ती‎ चौक उड्डाणपुलाचे बांधकाम‎ आतापर्यंत सुरू केले नाही.‎

बातम्या आणखी आहेत...