आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीसाठी चोख बंदोबस्त:मिरवणूक मार्ग; वाहतूक मार्गात बदल मुसळधार पावसामुळे गणेश मंडळाच्या उत्साहावर विरजण

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा प्रथमच गणेशाेत्सव विसर्जन मिरवणूकीला सकाळी 11 वाजता प्रारंभ हाेणार आहे. मिरवणूक साधारणत: 14 तास म्हणजे रात्री 1 ते दीड वाजेपर्यंत चालण्याची शक्यता आहे. यादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 1 हजार गृहरक्षक दलाचे जवान, अति शीघ्र कृती दल, राज्य राखीव दल, एसआरपीएफची प्रत्येकी एक तुकडी नाशिकमध्ये तैनात करण्यात आली आहे.

विर्सजन मिरवणूक मार्ग -

वाकडी बारव (चौकमंडई), जहागिर मशिद - दादासाहेब फाळके रोड- महात्माफुले मार्केट बादशाही लॉज कॉर्नर - विजयानंद थिएटर गाडगे महाराज पुतळा - गो. ह. देशपांडे पथ-धुमाळ पॉईन्ट- सांगली बॅक सिग्नल - महात्मा गांधी रोड - मेहेर सिग्नल - स्वामी विवेकानंद रोड (जुना आग्रारोड), अशोकस्तंभ- रविवार कारंजा - होळकर पुल - मालेगाव स्टॅन्ड - पंचवटी कांरजा मालवीय चौक-परशुराम पुरीया रोडने - कपालेश्वर मंदीर - भाजी बाजार - म्हसोबा पंटागण विसर्जन ठिकाण अशी बाप्पांची मिरवणूक निघणार आहे.

पर्यायी मार्ग- विवीध उपनगरातील खासगी वाहनांना दुचाकी व कार यांना मिरवणूक मार्गावर प्रवेश बंद असताना पर्यायी मार्ग म्हणून द्वारका चाैकातून सारडा सर्कल शालीमार चाैकातून सीबीएस वरून टिळकवाडी मार्गे गंगापूरराेडवरून जिल्हा परिषद पशूप्राणी रूग्णालयापासून रामवाडी पुलावरून पंचवटी कारंजाकडे किंवा पेठराेडवरून निमाणीकडे जातील. मिरवणकू मार्ग वगळता वाहतूक सुरळीत सुरू राहिल.

विसर्जन मिरवणूक मार्ग बंदाेबस्त

1 आयुक्त, 4 उपायुक्त, 6 सहाय्यक आयुक्त, 40 निरीक्षक, 225 सहाय्यक व उपनिरीक्षक, 3 हजार अंमलदार, यासह 150 कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक, 1 हजार गृहरक्षक दलाचे जवान, अति शीघ्र कृती दल, राज्य राखीव दल, एसआरपीएफची प्रत्येकी एक तुकडी दाखल आहे.

मिरवणुकीचे मार्गावर सर्व प्रकारच्या मोटार वाहनांकरीता (मिरवणुकीतील वाहने वगळुन) सकाळी 10.00 वाजेपासून मिरवणुक संपेपर्यंत वाहतूकीसाठी बंद राहील.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची 200 हून अधिक कर्मचारी तैनात

बसेसला पर्यायी मार्ग

पंचवटी एस. टी. डेपो क्रमांक 2, सिटी लिंक, तपोवन, निमाणी बस स्थानक तसेच पंचवटी कारंजा येथुन सुटणा-या शहर वाहतुकीच्या सर्व बसेस हया पंचवटी डेपो येथुन सुटतील तसेच ओझर, दिंडोरी, पेठ येथुन शहरात येणा-या सर्व बसेस व वाहने आडगाव नाका, कन्नमवार पुल व पुढे व्दारका सर्कलकडून नाशिकरोड, नाशिक जातील तसेच पंचवटीकडे जाणारी सर्व वाहने व्दारका सर्कल कन्नमवार पुलावरुन जातील. रविवार कांरजा व अशोकस्तंभ येथुन सुटणा-या शहर वाहतूकीच्या बसेस शालीमार येथून सुटतील व त्याच मार्गाने ये-जा करतील.

बातम्या आणखी आहेत...