आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात नगरपरिषद कार्यालयात साजरी करण्यात आली. श्री संताजी मंगल कार्यालयातून रथ मिरवणूक काढण्यात आली. यात जगनाडे महाराज यांची प्रतिमा व मूर्ती हाेती.पुष्पहार अर्पण करतांना तेली समाजाचे अध्यक्ष रमेश बोरस्ते, अरूण गणोरे, शरद कर्पे, शाम शिंदे, सतिष सोनवणे, ऋषिकेश कर्पे, केशव वाघ, बाबुराव लुटे, संतोष सोनवणे आदी उपस्थित होते. प्रारंभी मारुती वेशीपासून शिवाजी चौक, मेनरोड, प्रियदर्शिनी शाँपिंग सेंटर, महात्मा फुले चौक, भगवा चौक, तांबट गल्ली, माधवराव पहिलवान चौक, मल्हार चौक, चाँदनी चौक, राजवाडा, तेली गल्ली, महाराणा प्रताप चौक, नगरपरिषद रोड, तानाजी चौक येथून मिरवणूकीची सांगता करण्यात आली,श्री संताजी महाराज मंगल कार्यालयात भोलेहर भजनी मंडळातर्फे कीर्तन उत्सवाचे आयाेजन करण्यात आले.
श्री संताजी महाराज यांच्या पुरातन ओव्या व अभंग सादर झाले. आरती व पूजन माजी जि.प. सदस्य यतीन कदम व सुनिल कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.ओझर मर्चंट बँकेत निवडून आलेले प्रविण वाघ, गणेश बोरस्ते तसेच तैलिक महासभेच्या युवा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नितीन महाले यांचा सत्कार अध्यक्ष रमेश बोरस्ते, अरूण गणोरे, सुनिल कर्पे, संतोष सोनवणे, केशव वाघ यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी रुपाली सोनवणे, अनुराधा गणोरे, स्नेहा थोरात, वृषाली बोरस्ते, कोशल्या कर्पे, संगिता व्यवहारे, सविता कर्पे, भारती वेताळ, वैशाली लुटे, सुवर्णा कोरडे,ज्ञानेश्वर कर्पे, हिंमतराव चौधरी, रामदास मोरे, मनोज सुर्यवंशी,सुरेश चौधरी उपस्थित हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.