आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय वायुदलात भरती होणाऱ्या वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले ‘एचटीटी-४०’ जातीचे संपूर्णत: भारतीय बनावटीचे विशेष प्रशिक्षण विमाने तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. यातील ६० विमाने ओझर येथील एचएएल प्रकल्पात तयार होणार असून त्यासाठी ६ हजार ८०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे ३ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम मिळणार आहे, तर स्थानिक व्हेंडर्ससह इतर उद्याेगांना व्यवसाय मिळणार असून राेजगार निर्मितीही वाढणार आहे.
ओझर एचएएलमध्ये आजपर्यंत अनेक जातींच्या विमानांची निर्मिती झाली आहे. येथील कारखान्यात सुमारे ३ हजार अधिकारी, कर्मचारी आहेत. विविध जातींची लढाऊ विमाने तयार करण्यात एचएएल प्रशासनाचा मोठा हातखंडा आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून एचएएलकडे कामाचा ओघ काहीसा कमी आहे. यातूनच विमाने तयार करण्याचे वाढीव काम एचएएल प्रकल्पाला मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून खासदार हेमंत गोडसे प्रयत्नशील होते. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल मंडलिक, सचिव संजय कुटे, गिरीश पाटील आदींनी संरक्षण विभागाचे सचिव अजयकुमार यांची भेट घेत काम देण्यासाठी साकडे घातले होते.
पहिले विमान केव्हा तयार होणार याचा मुहूर्त ठरणार १३ मार्च रोजी
दरम्यान, संरक्षण मंत्रालयातील उत्पादन विभागाचे सचिव येत्या १३ मार्चला नाशिकमध्ये येणार आहेत. त्या वेळी उत्पादन कधी सुरू होणार तसेच पहिले विमान केव्हा तयार होणार याबाबत चर्चा होणार आहे, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
क्षमता, ताशी ४०० किमी वेग
एका वेळी ३ तास उड्डाणाची क्षमता, ताशी ४०० किमी वेग
संपूर्णत: भारतीय बनावटीच्या या विमानाचा ताशी वेग ४०० किलोमीटर असून हे विमान एकावेळी तीन तास उड्डाण करू शकते. ७० पैकी १० बंगळुरूला तर उर्वरित ६० विमानांची निर्मिती ओझर एचएएलमध्ये होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.