आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाैरव‎:प्रा. कुलकर्णी यांना ‘जीवनगाैरव’‎

नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोखले एज्युकेशन सोसायटीचे नाशिक‎ विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी‎ यांना त्यांच्या शैक्षणिक व लेखन क्षेत्रातील‎ कार्याबद्दल देशस्थ ऋग्वेदी संस्थेचा‎ जीवनगौरव पुरस्कार आमदार देवयानी फरांदे‎ आणि ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक यांच्या‎ हस्ते प्रदान करण्यात आला.

डॉ. राम‎ कुलकर्णी यांनी आतापर्यंत प्राचार्य म्हणून‎ विविध महाविद्यालयांमध्ये केलेले कार्य‎ तसेच ''स्वयंविकास'' साहित्य क्षेत्रात केलेले‎ ७५ पुस्तकांचे लेखन तसेच विविध विषयांवर‎ आयोजित केलेले १०५ सेमिनार व परिषद या‎ उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा जीवनगौरव‎ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.‎ संस्थेचे अध्यक्ष़ मुकुंदराव कुलकर्णी,‎ कार्यवाह मकरंद सुखात्मे, प्राचार्या डॉ. मंजूषा‎ कुलकर्णी, प्रा. नीता कुलकर्णी, प्रा. सागर‎ कुलकर्णी आदी उपस्थित हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...