आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Shahu Maharaj Birth Centenary, Year round Program On The Occasion Of Rajarshi Shahu Maharaj Smriti Shatabdi; Establishment Of Committee, Raju Desale As Chairman

विचारजागर:राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दीनिमित्त वर्षभर कार्यक्रम; समिती स्थापन, अध्यक्षपदी राजू देसले

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी, त्यांचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. त्यासाठी राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी समिती स्थापना करण्यात आली असून, समितीच्या अध्यक्षपदी राजू देसले यांची निवड करण्यात आली.

आयटक कामगार केंद्र, नाशिक समितीची पहिली बैठक अ‌ॅड. प्रकाश काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शाहू महाराज स्मृती शताब्दीच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी व्यक्ती व संस्थांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. आभार प्रभाकर धात्रक यांनी मानले.

पहिले कार्यक्रम असे

- दि. 26 जून 2022 रोजी सकाळी 10 वा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सीबीएस नाशिक अभिवादन जयंती

- दि. 27 जून सायंकाळी 5:30 वा. डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे जाहीर व्याख्यान

अशी आहे समिती

समितीच्या अध्यक्षपदी राजू देसले, सरचिटणीसपदी जयवंत खडताळे, उपाध्यक्षपदी अ‌ॅड. प्रकाश काळे, अ‌ॅड. नाझीम काजी, प्रफुल्ल वाघ, सहसचिव डॉ. अनिल आठवले, खजिनदार प्रभाकर धात्रक, कार्यकारणी सदस्य व्ही. टी. जाधव, करुणासागर पगारे, प्रा. एस. के. शिंदे चंद्रकांत गायकवाड, प्रल्हाद मिस्त्री, वसंत एकबोटे, सोमनाथ मुठाळ, संजय करंजकर, निशिकांत पगारे, विजय राऊत, समीर शिंदे, तातेराव जाधव, शिवदास म्हसदे, विजय राऊत, निशिकांत पगारे, कुणाल गायकवाड, अरुण घोडेराव, तल्हा शेख, महादेव खुडे यांचा समावेश आहे.

यांचा झाला सन्मान

सावाना निवडणूक विजयी झाल्याबद्दल प्रा. सोमनाथ मुठाळ, डॉक्टरेट मिळवल्याबद्दल अनिल आठवले, किसान सभा राज्य उपाध्यक्षपदी राजू देसले यांची निवड झाल्याबद्दल सत्कार समितीच्या वतीने करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...