आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्यिक मेळावा:प्रगतिशील लेखक संघाचा साहित्यिक मेळावा 6 राेजी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रगतिशील लेखक संघ शाखा तसेच इंडियन पिपल्स थिएटर (इप्टा) व कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जिल्ह्यातील प्रागतिक, परिवर्तनवादी साहित्यिकांचा मेळावा रविवारी (दि. ६) राेटरी हाॅल, गंजमाळ येथे हाणार आहे. हा मेळावा आयाेजनाची भूमिका समाजात वैज्ञानिक दृष्टिकाेन रुजविणे, जातिअंत, वर्गअंत, स्त्रीदास्यमुक्त समाज निर्मितीसाठी सांस्कृतिक रेटा निर्माण करणे हा आहे.

आदिवासी समाजातील धडाडीचे कथालेखक संजय दाेबाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा हाेईल. उदघाटनाचे पहिले सत्र सकाळी १० ते ११ या वेळेत असून पुणे येथील हाेप फाउंडेशनचे संस्थापक डाॅ. अमाेल देवळीकर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद‌्घाटन हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...