आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचे संशाेधन ठरले सरस:संदीप फार्मसीचा प्रकल्प आंतरविद्यापीठस्तरावर

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठअंतर्गत विभागीयस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा नुकतीच पुणे येथे पार पडली. स्पर्धेत नाशिकच्या संदीप फाउंडेशन संचलित फार्मसी काॅलेजमधील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पर्यावरणपूरक ‘हर्बल डेनटॅब’ (चघळायची गाेळी) या प्रकल्पाची निवड राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी झाली आहे.

आविष्कार संशोधन स्पर्धा प्रथम जिल्हास्तरावर घेण्यात आली. त्यामध्ये महाविद्यालयातील तृतीय वर्षाचे बी. फार्मसी चिरायु पाटील, अविनाश पवार, निर्मल शेलार या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली. या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय स्पर्धेतून विद्यापीठस्तरीय निवड झालेली असून हे विद्यार्थी आता राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेसाठी पात्र झालेले आहेत. विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बोरसे, स्पर्धेचे समन्वयक डॉ. अतुल बेंडाळे, फाउंडेशनचे डॉ. संदीप एन. झा यांचे मार्गदर्शन लाभले.

सैनिकांसह अंतराळवीरांसाठी गाेळीचा वापर
स्पर्धेत हर्बल डेनटॅब टूथपेस्टचा पर्याय या संशोधन विषयावर सादरीकरण करण्यात आले. हर्बल डेनटॅब टूथपेस्ट म्हणजे नैसर्गिक वनस्पतीपासून तयार केलेली गाेळी. ती ताेंडात टाकून चघळायची. त्यानंतर गुळण्या करून पाणी बाहेर न फेकता गिळून घ्यायचे. त्याने ताेंड धुतल्यासारखे वाटते. हर्बल डेनटॅब गाेळी सैनिकांसाठी, अंतराळवीरांसाठी वापर करता येईल. या प्रकल्पातून विद्यार्थ्यांनी संशाेधन वृत्तीला चालना दिली.

बातम्या आणखी आहेत...