आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्याेगमंत्र्यांच्या निर्णयांचा धडाका:मालमत्ताकर पूर्वीप्रमाणे, ‘अग्निशमन’ द्या पालिकेकडे, पाेलिस स्टेशनही सुरू करू

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड औद्याेगिक वसाहतीतील अग्निशमन केंद्र महापालिकेने ताब्यात घेऊन चालवावे आणि १ एप्रिलपासून फक्त महापालिकेचाच फायर सेस उद्याेेजकांनी भरावा, मालमत्ता करवाढीच्या संदर्भातील जाे प्रस्ताव राज्य शासनाकडे विखंडनासाठी पडून आहे, ताे रद्द करण्यात यईल तसेच रखडलेला सीइटीपी प्रकल्प एमआयडीसीनेच उभारावा याकरिता तातडीने ‘निरी’कडून अपेक्षित अहवाल मिळवून ताे पालिकेला पाठवावा, असे स्पष्ट आदेश उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी दिले.

जिल्ह्यातील उद्याेजकांच्या समस्यांबाबत मंत्रालयातील बैठकीत बुधवारी त्यांच्या निर्णयांचा धडाका पहायला मिळाला. मालमत्ताकराच्या संदर्भात तातडीने विखंडनाचा ठराव रद्द केला जाईल, ज्याचा फायदा आज साेसत असलेल्या उद्याेग, व्यवसाय, घरगुती मालमत्ता असलेले नाशिककर या सगळ्यांना हाेईल. तर प्लेटिंग आणि काेटिंग उद्याेगांसाठी महत्त्वाची सीइटीपी उभारणी एमआयडीसीने करावी तर झिराे लिक्वीड डिस्चार्जचे पाणी महापालिकेच्या ड्रेनेज लाइनमध्ये साेडण्यात यावे याकरीता निरीचा अपेक्षीत अहवाल एमआयडीसीने मिळवून ताे महापालिकेला सादर करण्याचे आदेश यावेळी दिले गेले. बैठकीला पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गाेडसे, आमदार सिमा हिरे यांसह संबंधित विभागांचे सचिव, वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हाधिकारी गंगाथरन डी. महापालिका आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांसह अधिकारी आणि निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, जनरल सेक्रेटरी ललित बुब, सिन्नर औद्याेगिक सहकारी वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे यांसह उद्याेजक उपस्थित हाेते.

डीएमआयसीमध्ये समावेशासाठी याच महिन्यात बैठक : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल काॅरीडाेअरमध्ये नाशिकचा समावेश व्हावा याकरीता राज्य शासन जमीन द्यायला तयार असल्याचे स्पष्ट करतांनाच १६ किंवा १७ डिसेंबरला केंद्रीय मंत्री पीयूष गाेयल यांच्याकडे यासंदर्भात तातडीने बैठकीचे आयाेजन करणार तसेच विमानसेवेसाठीही स्वतंत्र बैठक हाेईल याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्रासाठी खादी ग्रामाेद्याेगची जागा : शहरात कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारण्यासाठी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील खादी ग्रामाेद्याेगच्या ताब्यातील जागेपैकी ५० एकर जागा देण्यासाठी सहमती देतांनाच ही जागा मिळविण्यासाठीचे सगळे प्रयत्न राज्य शासन करणार असल्याचा महत्वाचा निर्णय मंत्री सामंत यांनी यावेळी घेतला.

उद्याेगमंत्र्यांच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय असे... { आठवडाभरात स्वतंत्र पाेलिस स्टेशन सुरू करणार. { पाॅवर प्राेजेक्ट वगळता इतर जमीन परत घेण्यासाठी कायदेशीर बाबी तपासण्याचे निर्देश. { `बंद जकात नाक्यांजवळ तर एमआयडीसीनेही औद्याेगिक वसाहतीत जमीन द्यावी. { साेलर धाेरण कायम ठेवावे. { आठवडाभरात डेटा सेंटरचे प्रतिनिधी नाशकात. { चांगल्या वीजपुरवठ्यासाठी महावितरणने सुविधा द्याव्या. { एमआयडीसीत पायाभूत सुविधा उभारणीसाठी २५ टक्के उद्याेग तर ७५ टक्के निधी शासन देणार { खंडणी, वर्गणी यांना पायबंद घालणारे निर्भय धाेरण लवकरच. { एलबीटी प्रलंबित प्रकरणांत तातडीने मंजूर परतावे अदा करण्याचे पालिकेला आदेश. { सातपूर-अंबडमध्ये ड्रेनेजसाठी अमृत-२ याेजनेतून पालिकेने प्रस्ताव द्या.

बातम्या आणखी आहेत...