आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस महासंचालक:अंबड, सातपूर पोलिस ठाण्यांच्या विभाजनातून एमआयडीसी स्वतंत्र पोलिस ठाण्याचा प्रस्ताव ; रजनीश सेठ यांची माहिती

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड आणि सातपूर पोलिस ठाण्यांचे विभाजन करून स्वतंत्र एमआयडीसी पोलिस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून शासनाने मंजुरी दिल्यास शहर पोलिस आयुक्तालयात १४ वे नवीन पोलिस ठाणे लवकरच सुरू होण्यास मंजुरी मिळण्याची शक्यता वाढली आहे. शहराच्या लगत असलेल्या ग्रामीण पोलिसांच्या हद्दीचाही शहर आयुक्तालयात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी येथे दिली. पोलिस आयुक्तालयात शहरातील गुन्हेगारी आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावा त्यांनी घेतला.

महासंचालकांनी सकाळी १०.३० ते १.३० वाजेपर्यंत पोलिस आयुक्तालयात बैठक घेत गुन्हे, कायदा व सुव्यवस्था आणि पोलिसांच्या प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. शहर पोलिस आयुक्तालयाच्या शेजारील कोणता ग्रामीण भाग आयुक्तालयात जोडावा याची फेरतपासणी करून अहवाल पाठविण्याच्या सूचना केल्या. बंद पडलेल्या पोलिस चौकी, कार्यरत नसलेल्या चौक्यांची माहिती घेतली. दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, लाउडस्पिकरसंबंधी आंदोलने कडकपणे हाताळावी, सोशल मीडियावर अवमानकारक पोस्ट टाकणाऱ्या समाजकंटकांवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. उपआयुक्त संजय बारकुंड, अमोल तांबे, विजय खरात, पौर्णिमा चौघुले यांच्यासह सहायक आयुक्त, एसआयडीचे अधिकारी उपस्थित होते.

पीपीटीद्वारे घेतली गुन्ह्यांची सखोल माहिती पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी गुन्हेगारी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती आणि गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी करण्यात येत असलेल्या कारवाया, झालेल्या कारवाया, गुन्हेगारांचे समुपदेशन, पोलिसिंग वाढवण्याच्या नियोजन, गुन्ह्यांचा शोध आणि खुनासारखे गंभीर गुन्हे, नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन, हिस्ट्रशीटर तपासणी, रात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई यावर सादरीकरण केले. शंभर टक्के गुन्हे उघडकीस आणल्याने महासंचालकांनी शहर पोलिसांच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...