आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Proposal Of Municipal Ring Road By Nashik Police, Decision In Traffic Branch Office Meeting To Prevent Heavy Traffic In Indiranagar Area

नाशिक पोलिसांकडून मनपाला रिंग रोडचा प्रस्ताव:इंदिरानगर भागातील अवजड वाहतूक रोखण्यासाठी वाहतूक शाखा कार्यालयातील बैठकीत निर्णय

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदिरानगर -वडाळागाव- पाथर्डी राेड परिसरातील अवजड वाहनाच्या वाहतूकीचा प्रश्न सोडविण्यासाठी रहिवाशी, राजकीय मंडळीने केलेल्या उपाेषणानंतर लागलीच पाेलिस यंत्रणेकडून एकत्रित बैठक घेत पर्यायी मार्ग म्हणून रिंगराेडचा प्रस्ताव पाेलिसांकडून मनपा व महामार्ग प्राधिकरणाकडे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बुधवारी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सिताराम गायकवाड यांच्या कार्यालयात इंदिरानगर, वडाळागावातील प्रमुख राजकीय, सामाजीक कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. इंदिरानगर परिसरात अवजड वाहनांच्या वाहतूकीमुळे वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण हाेवून अपघाताच्या घटना घडत असल्याने वारंवार ही वाहतूक पर्यायी मार्गाने साेडविण्याची मागणी केली जात हाेती. त्याची दखल घेतली जात नसल्याने अखेरीस लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली दाेनच दिवसांपूर्वी सामूहिक आंदाेलन करण्यात आले.

या आंदोलनाची दखल घेत पाेलिस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यालयात लोकप्रतिनिधी व संस्था, औद्याेगिक संघटनांच्या प्रतिनिधीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अवजड वाहतूकीमुळे निर्मण हाेणाऱ्या समस्यांचा उहापाेह करण्यात आला. वाहतूकीचा प्रश्न सोडविण्याबाबत अनेक विचारमंथन करण्यात आले. यावर या मार्गाला पर्यायी एक रिंगराेड (वळणरस्ता) निर्मीतीचा प्रस्ताव मनपा व महामार्ग प्रशासनास सादर करून त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन सहायक आयुक्त गायकवाड यांनी दिले. या निर्णयावर उपस्थितीनांी समाधान व्यक्त केले.

निमा,आयमा प्रतिनिधीकडून सूचना

इंदिरानगर व तपोवन मार्गे होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करता येईल का? अशी सुचना करताच सर्वांनी विराेध दर्शविला. मालवाहू वाहनांना इंदिरानगर भागातून प्रवेश बंद केल्यास औद्योगिक वसाहतीस कच्चा माल मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे त्याचे दुरगामी दुष्परिणाम होतील. मालवाहू वाहनांना प्रथम योग्य मार्ग (रिंगरोड) व थांब्यासाठी ट्रक टर्मिनल सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याची बाब आयमा, निमा व ट्रक संघटनेच्या प्रतिनिधींनी बाेलून दाखविली. संबधित विभागाची लवकरच बैठक घेण्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

बैठकीस वरिष्ठ निरीक्षक सुभाष पवार, सुधीर ठाेंबरे, पराग जाधव, दिनकर कदम,राकेश हांडे, एस. आर. बांबळे, छाया देवरे, राजेंद्र वाघ, आयमा, निमा व ट्रक संघटनेचे प्रतिनिधी राजेंद्र फड, मनिष रावल, किशोर इंगळे, रविंद्र झोपे, संजय सोनवणे, सुदर्शन डोंगरे, अमोल शेळके व मनपा प्रतिनिधी, आैद्याेगिक संघटना तसेच ट्रक मालक-चालक संघटनेचे सदय उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...