आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्यक्ष चौकशी:अधीक्षक पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव

नाशिक6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीणचे तत्कालीन अधीक्षक सचिन पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पिंपळगाव टोलनाका येथे टोल कर्मचाऱ्यांनी अधीक्षकांचे वाहन अडवून ठेवले होते. अधीक्षक पाटील यांनी कर्मचाऱ्यांवर अरेरावी केली होती.पाटील अधीक्षक असतांना ऑगस्ट महिन्यात पिंपळगाव टोल नाका येथून जातना कर्मचाऱ्यांनी अधीक्षक पाटील यांच्याशी हुज्जत घातली होती. याप्रकरणी महासंचालकांनी विशेष पोलिस महानिरीक्षक प्रसन्ना यांना चौकशीचे आदेश दिले होते. घटनास्थळावर प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली. टोलनाका संबंधित सर्वांचे जबाब नोंदवण्यात आले होते. महानिरीक्षक प्रसन्ना यांनी २५ पानांचा अहवाल पाठवला होता. यात पाटील यांनी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आला असल्याची माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...