आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप.पू. आचार्य सम्राट श्री आनंदऋषीजी यांची पुण्यतिथी व उत्तर भारतीय प्रवर्तक प. पू. आशिषमुनीजी यांच्या जन्मदिवसानिमित्त श्री नवकार आशिष सेवा ट्रस्ट, साधू वासवानी मिशन (पुणे), निवासी अपंग कल्याण केंद्र (सटाणा), बागलाण एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांना विनामूल्य कृत्रिम अवयव (जयपूर हात, पाय) बसविण्यासाठी सटाणा येथे रविवारी (दि. २६) विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व वयोगटांतील गरजू रुग्ण त्यात सहभागी होऊ शकतील या शिबिरांतर्गत कृत्रिम अवयव बसविण्यासाठी गरजूंनी बुधवार, (दि. १५) पर्यंत नावनोंदणी करणे गरजेचे आहे.
दि.२६ राेजी सटाणा येथे बागलाण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत सकाळी ९ पासून प्रत्यक्षात माप घेतले जाईल. शिबिर पूर्णपणे विनामूल्य असून जास्तीत जास्त गरजूंनी उपक्रमात सहभागी होऊन अपंगत्वावर मात करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी नीलेश जे. भंडारी यांच्याशी ९८५०९०५७६७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही संयोजकांनी कळविले आहे. माप घेतल्यानंतर एक महिन्याने एप्रिलमध्ये अवयव बसविण्यात येतील. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी संदीप गांग, विनोद कांकरिया, पंकज कोठारी, हर्षद चोपडा, सतीश लुंकड तसेच वळवी व धोंगडे प्रयत्नशील आहेत. उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष असून यापूर्वी नाशिक व अहमदनगर येथे झालेल्या शिबिरांना उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.