आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आ.जितेंद्र आव्हाड यांनी पुणे येथे जाहिर कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा निषेध करत भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगराच्यावतीने रविवार कारंजा येथे आव्हाड यांच्या पुतळयाला जोडे मारुन त्यांचा निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादीचे नेते आमदार तथा माजी मंत्री चंद्र आव्हाड यांच्याकडून वारंवार महापुरुषांचा अपमान केला जात आहे.इतिहासातून मोगलांचा इतिहास काढून टाकणार याचा संदर्भ देत छत्रपती शिवाजी महाराज काय गोटया खेळेले का ?औरंगजेब आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना ? अफजल खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना ? शाहिस्ते खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना ? असे वादगस्त विधान आव्हाड यांनी केले आहे. यापुर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंगकाठीवरून आव्हाड यांनी चुकीचे वक्तव्य केलेले आहे. ते वक्तव्य महाराष्ट्र अजून विसरलेला नाही. त्यानंतर हि आव्हाड यांनी हे वक्तव्य करून शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या आहेत. एकीकडे 19 फेब्रुवारी हि शिवरायांची जयंती सोहळा साजरा करण्याची महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरु असतांना दुसरीकडे आव्हाडांनी हे वादग्रस्त विधान करून शिवप्रेमीना डिवचले आहे.
भाजपा युवा मोर्चा नाशिक महानगराचे अध्यक्ष अमित घुगे यांच्या नेतृत्वाखाली रविवार कारंजा येथे झालेल्या आंदोलनात आव्हाड यांचा तीव्र निषेध करत त्यांनी माफी मागावी अशी आग्रही मागणी युवा मोर्चा पदाधिकाऱ्यानी केली आहे.
या आंदोलनाप्रसंगी अमित घुगे, योगेश मैंद, भैरवी वाघ, अनिकेत पाटील, विजय बनछोडे, अंकित संचेती, सचिन तांबे, हर्षद जाधव, निखीलेश गांगुर्डे, प्रशांत वाघ, प्रविण भाटे, पवन उगले, प्रसाद धोपावकर, साक्षी दिंडोरकर, आदित्य केळकर, पवन गुरव, गोपी राजपुत, अक्षय गांगुर्डे, गणेश मोरे, विजय गायखे, एकनाथ नवले, राम बडगुजर, प्रज्वल जोशी, संदिप दोंदे, विनोद येवले, हर्षद वाघ आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.