आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धांजली:सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा निषेध, द्वारका भागात फलक ; गुरू रामदास सामाजिक प्रतिष्ठानतर्फे श्रद्धांजली

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची पंजाबमध्ये नुकतीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. नाशिक ये‌थील गुरु रामदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला. द्वारका परिसरात घटनेप्रकरणी कठाेर कारवाई करून मुसेवाला यांना न्याय मिळवून द्या, असा फलक लावण्यात येऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ‘व्ही डिमांड जस्टीस फोर सिद्धू मूसेवाला’ असे मोठे बॅनर लावण्यात आले हाेते. यावेळी शरणसिंग गिल करणसिंग गिल, कुलविंदर गहिर, आशिष कालरा, विक्रम साळवे, कुलदीप औलख, समेशरसिंग गिल आदी उपस्थित होते. सिद्धू मूसेवाला यांनी संगित क्षेत्रात अनेक तारे घडविले. त्यांची झालेली हत्या निंदणीय असल्याची प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...