आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:अग्निपथ योजनेचा निषेध; रायुकाँची निदर्शने

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या प्रस्तावित अग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने गंगापूररोड येथील शहीद चौकात सोमवारी (दि. २०) सकाळी निदर्शने करून निषेध व्यक्त केला. ‘अग्निपथ योजना वापस लो, तानाशाही नही चलेगी’अशा घोषणा देत जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आले. शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश प्रवक्ते महेश तपासे व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केल्यानंतर अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी महिला शहराध्यक्षा अनिता भामरे, महेश भामरे, किशोर शिरसाठ, शादाब सय्यद, योगिता पाटील, मुकेश शेवाळे, बाळा निगळ, जय कोतवाल, गणेश पवार, सागर बेदरकर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...