आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील मध्यवस्तीत असलेल्या व नवीन वसाहती निर्माण झालेल्या कर्मयोगीनगर, गोविंदनगर, उंटवाडी परिसरातील जॉगिंग ट्रॅकचे काम त्वरित सुरू करावे, वाढत्या अपघाताच्या घटना लक्षात घेता तातडीने गतिरोधक बसवावेत, उद्यानांमधील अस्वच्छता दूर करण्याच्या मागणीसाठी रहिवाश्यांनी थेट ररस्त्यावर उतरूनच आंदाेलन केले. आंदाेलनकर्त्यांनी आर. डी. सर्कल चाैकातच प्रशासनाच्या निषेधाच्या घाेषणा दिल्या.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवार (दि. 21) रस्त्यावर उतरून निदर्शने केली. अधिकार्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दुर्दशा थांबवावी, खड्डे बुजवून रस्त्यांचे डांबरीकरण करावे, यासह विविध समस्या सोडविण्यासाठी बुधवारी कर्मयोगीनगर कॉर्नर येथील जॉगिंग ट्रॅक आणि सुशोभिकरणाचे काम त्वरित सुरू करावे, रस्त्यांवर गतिरोधक बसवावेत, नयनतारा इमारतीसमोरील रस्ता दुभाजक काढून भुजबळ फार्मकडे सरळ मार्ग करावा या मागण्या केल्या.
याशिवाय खड्डे बुजवून रस्त्यांचे डांबरीकरण करावे, उद्यानांची दुर्दशा थांबवावी, रस्ता दुभाजकांचे सुशोभिकरण करावे आदी मागण्यांचे निवेदन शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने वेळोवेळी महापालिकेला दिले.
ही कामे होत नसल्याने प्रशासनाला जाग येण्यासाठी बुधवारी, 21 डिसेंबर 2022 रोजी शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग 24 मधील नागरीक रस्त्यावर उतरले. आर डी सर्कल, कर्मयोगीनगर कॉर्नर येथील नियोजित जॉगिंग ट्रॅकवर घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. या सर्व समस्या त्वरित सोडविण्यात येतील, असे आश्वासन महापालिका बांधकाम विभागाचे उपअभियंता हेमंत पठे, शाखा अभियंता जगदिश रत्नपारखी यांनी आंदोलकांना दिले. यानंतर रास्ता रोकोचा निर्णय मागे घेण्यात आला. समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, प्रभाकर खैरनार, धवलताई खैरनार, संगिता देशमुख, संध्या छाया ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, बापूराव पाटील, विनोद पोळ, निलेश ठाकूर, अशोक गाढवे, भास्कर चौधरी, राजमाता जिजाऊ हास्य क्लबच्या छाया नवले, भारती देशमुख, रंजना सुर्वे, वंदना पाटील, शीतल गवळी, वृषाली ठाकरे, सुरेखा बोंडे, सरीता पाटील, कुमुदिनी फेगडे, संगिता चोपडे, रूही राजहंस, , यशोदा अमृतकर, यांच्यासह राजमाता जिजाऊ महिला हास्य क्लबच्या सदस्या यावेळी हजर होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.