आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांचे फी वाढीविरोधातील आंदोलन:'जेएमसिटी' इंटरनॅशनल शाळेच्या विरोधातील आंदोलन पालकांना भोवले, प्रकरणात 7 पालकांवर गुन्हा दाखल

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाळा प्रशासनाकडून 6 हजार रुपये शुल्क वाढविण्यात आल्याने तसेच कोरोनाकाळात शाळा ऑनलाईन सुरू होती त्याचे देखिल पूर्ण शुल्क मागितली जात असल्याने शैक्षणिक शुल्कात सवलत देण्याची मागणी 'जेएमसिटी' इंटरनॅशनल शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी अमान्य केल्याच्या निषेधार्थ पालकांनी शनिवारी शाळेविरोधात ठिय्या व रास्ता रोको आंदोलन केले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात सात पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडाळारोड भागातील जुम्मा मशीद जेएमसीटी इंटरनॅशनल स्कूलच्या पालकांनी फी वाढीच्या निषेधार्त विना परवानगी रास्ता रोको आंदोलन करून वाहतुकीस अडथळा निर्माण करून पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याने व पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दस्तगीर उस्मान शेख, रियाजउद्दिन फारुकउद्दिन बागवान, फहीम शेख,

नालिया बागवान, उजमा बागवान, गुलाम चांद शेख, फिरोज शेख या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास वपोनी सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळू गिते करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...