आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसतर्फे निदर्शने:काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, घोषणाबाजी ; राहूल गांधी यांच्या ईडी चौकशीचा निषेध

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा खासदार राहुल गांधी यांना जाणीवपूर्वक ईडीकडून चौकशीच्या नावाने चार दिवसांपासून आठ ते दहा तास बसवून ठेवले जात असल्याचा आरोप करीत शहर व जिल्हा काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. १७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. केंद्रातील भाजप सरकार विरोधी पक्षातील नेत्यांना अंमलबजावणी संचालनालय (ईडी)च्या माध्यमातून विनाकारण चौकशांमध्ये अडकवून ठेवले जाते. विरोधकांना खोट्या-नाट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना जेरीस आणण्याचे षड‌्यंत्र भाजप सरकारकडून अवलंबले जात असल्याचा आरोप प्रदेश सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे पाटील यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी व पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात चौकशी सुरू आहे. यामध्ये राहुल गांधी यांना चार दिवसांपासून चौकशीसाठी बोलावून त्रास दिला जात असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ‘नही चलेगी, नही चलेगी भाजप की दादागिरी, मोदी जब जब डरता है, तब तब ईडी को सामने लाता है’ अशा घोषणा दिल्या. याप्रसंगी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, सचिव प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, डॉ शोभा बच्छाव, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, गौरव पानगव्हाणे, वसंत ठाकूर, शाहू खैरे, वत्सला खैरे, बबलू खैरे, उद्धव पवार, आमदार हिरामण खोसकर, आशा तडवी, ज्ञानेश्वर काळे, संपत सकाळे, राजेंद्र बागूल आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...