आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:नाशिक सेंट्रल मार्केटला सुविधा उपलब्ध करून द्या; व्यापारी संघटनेची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक सेंट्रल मार्केट येथील हॉकर्स झोनमधील हॉकर्सधरकांना त्यांचे ठिकाण निश्चित करणे, तेथे रबर पेंटने मार्किंग करून नंबरिंग करून घेणे तसेच सिमेंट कांॅक्रिट रोडची डागडुजी किंवा नूतनीकरण करून घेण्याची कामे करत महापालिकेकडून याठिकाणी तातडीने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नाशिक सेंट्रल मार्केट व्यापारी संघटनेकडून महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आले.

माजी नगरसेवक प्रवीण तिदमे, छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, नीलेश शेलार, तुषार गवळी, डॉ. जयेंद्र थवील, डॉ. शाम थवील, राजेश पवार, सागर विसे, आसिफ शेख यावेळी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी परिसरातील नगरसेवक आणि महापालिकेकडे कित्येक वर्षांपासून पाठपुरावा करत याठिकाणी नाशिक सेंट्रल मार्केट मंजूर करून घेतले आहे.

नाशिक सेंट्रल मार्केट कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीच्या अध्यक्षपदी चेतन शेलार, उपाध्यक्षपदी मनोज लड, सरचिटणीसपदी गणेश शेलार, अतुल विसे, सागर विसे, श्रीकांत इशे, शैलेश मंडाले आदींचा समावेश आहे. या भागातील व्हिडिओ हॉल, ताडी, दारू दुकाने असे सर्व व्यवसाय बंद करून जुने वाडे, घरे, दुकाने, व्हिडिओ पार्लरच्या जागेवर नाशिक सेंट्रल मार्केटची उभारणी केली जात आहे

बातम्या आणखी आहेत...