आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निविदा प्रक्रिया:महिला बचत गटांना पोषण आहार काम द्या, अन्यथा उपाेषण

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला बचत गटांना पोषण आहार काम वाटपप्रश्नी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून दाेन-तीन दिवसांत हे काम महिला बचत गटांना न दिल्यास बेमुदत उपाेषण करण्याचा इशारा महापालिकेला देण्यात आला आहे.जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे वतीने पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २६ मे २०२२ रोजी शालेय पाेषण आहाराची निविदा प्रक्रिया राबविण्यात असल्याने १६ जून २०२२ रोजी निविदा उघडून छाननी करून प्रक्रिया राबविली गेली. त्यानंतर बचत गटांनी कर्ज काढले अपेक्षित किचनशेड भाड्याने घेऊन आज जवळपास तीन महिन्यांचे भाडे काम नसल्याने पुन्हा कर्ज काढून भरण्याची आफत बचत गटांच्या महिलावर आली आहे. यामुळे ह्या महिला तणावाखाली असल्याचे यात म्हटले आहे. या बचत गटांच्या सर्वच महिला गरीब, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजाच्या असून त्यांच्यावर म्हणून केवळ तो दृष्टिकोन ठेवून त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे आमचे स्पष्टच मत निवेदनात नमूद करण्यात आले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत ह्या महिला बचत गटांना शालेय पोषण आहाराच्या काम वाटपाचे स्पष्ट आदेश न दिल्यास मनपा प्रशासनाच्या विरोधात नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे वतीने आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, अशोक शेंडगे, विलासराज बागुल, अॅड. विकास पाथरे, दिलावर मनियार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...