आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई‎:बांधकाम ठिकाणी सुरक्षिततेच्या‎ उपाययाेजना करा; अन्यथा कारवाई‎

नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांधकामाचे प्रकल्प उभारताना त्या ठिकाणी‎ याेग्य त्या सुरक्षतेच्या उपाययोजना केल्या‎ जात नसल्याने अनेक दुर्घटना घडत असून‎ परिसरातील रहिवाशांनाही धुळीचा‎ त्रासााला सामाेरे जावे लागत असल्याच्या‎ तक्रारी आहेत. त्याची दखल घेत मनपा‎ आयुक्तांनी तातडीने उपाययाेजना न करता‎ बांधकाम करणाऱ्यांविराेधात कारवाई‎ करण्याचे निर्देश दिले आहेत.‎

यासंदर्भात मनपा आयुक्त डाॅ. चंद्रकांत‎ पुलकंुडवार यांनी बुधवार (दि. १) परिपत्रक‎ काढून अटीशर्तींचे पालन करण्याबाबतच्या‎ विविध सूचना नगरनियोजन विभागाचे‎ उपसंचालक, सहाय्यक संचालक तसेच‎ कार्यकारी अभियंत्यास दिल्या आहेत. मनपा‎ हद्दीत कोणत्याही बांधकाम मनपाची‎ बांधकाम परवानगी व कमेसमेन्ट‎ सर्टिफिकेट देताना विविध अटी-शर्ती नमूद‎ करण्यात येतात. नागरिकांच्या सुरक्षेसाठी‎ तसेच त्यांचा जीव धोक्यात येऊ नये,‎ यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे‎ व सभोवतालच्या परिसरात धूळ, कचऱ्याचा‎ नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी‎ बांधकामाच्या ठिकाणी हिरवी‎ जाळी बसविण्याची अट टाकण्यात‎ आली आहे.

परंतु, शहरातील काही‎ भागांमध्ये सध्या सुरू असलेल्या‎ बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेची‎ उपाययोजना केलेली दिसून येत‎ नाही. त्याअनुषंगाने आयुक्तांना‎ परिपत्रक जारी करत उपाययोजना न‎ करणाऱ्या विकासकासह बांधकाम‎ करणाऱ्या घरमालकांविराधात‎ अटीशर्तींचे पालन केले जात‎ नसल्याची शहानिशा करण्याची‎ सूचना आयुक्तांनी नगरनियोजन‎ विभागाला केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...