आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसीसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे द्या:पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे नाशिकच्या उद्योजकांची मागणी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औद्याेगिक वसाहतीकरीता स्वतंत्र पोलिस ठाण्याची उद्याेजकांची मागणी आल्यानंतर तातडीने त्यावर कारवाई केली असून लवकरच हे स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करणार आहे. मनुष्यबळाची पोलिस खात्यातही कमतरता असली तरी विविध ठिकाणाहून ती संख्या पूर्ण केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

आयमा रिक्रिएशन सेंटर येथे रविवारी उद्याेगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्याेजक संघटनांच्या बैठकीत भुसे बाेलत हाेते. व्यासपिठावर खासदार हेमंत गाेडसे, आमदार सीमा हिरे यांसह आयमाचे पदाधिकारी हाेते.

याच बैठकीत उद्याेजकांच्या विविध संघटनांनी समस्यांची अक्षरश: बरसात केली. जिल्हा उद्याेग केंद्राकडून झुमची बैठक तीन वर्षापासून झाली नसल्याकडे लक्ष वेधत ही बैठक नियमित झाली असती तर अनेक प्रश्न मार्गी लागले असते याकडे उद्याेगमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्याचबराेबर दिल्ली-मुंबइ इंडस्ट्रीयल काॅरीडाेअरच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश करावा, नवी औद्याेगिक गुंतवणूक नाशिकमध्ये येण्यासाठी प्रयत्न करावेत अशा अनेक मागण्याही केल्या गेल्या.

यांनी मांडले हे प्रश्न -

  • आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ - गुणत्तापुर्ण विजपुरवठा हाेत नाही, त्यासाठीचे अपेक्षीत पायाभुत सुविधा महावितरणकडे नसल्याचा फटका उद्याेगांना बसताे अाहे. नाशिकमधुन उडान याेजनेसह खुल्या दरानेही विमानसेवा सुरू व्हाव्या, दुहेरी फायर सेसची वसुली अंबडमध्ये सुरू असून राज्यात असा कर वसुल हाेत असलेली एकमेव औद्याेगिक वसाहत असून एकच कर वसुल व्हावा, जी-20 समिटमध्ये औरंगाबाद-पुण्याचा समावेश आहे, नाशिकलाही त्यात समाविष्ट करावे.
  • निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे - महापालिका - एमआयडीसीच्या ताठर भुमिकेमुळे सीइटीपी प्रकल्प रखडला असून ताे मार्गी लागावा, दिल्ली-मुंबइ इंडस्ट्रीयल काॅरीडाेरच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश करण्यात यावा, मालमत्ता कराची अकरापट हाेत असलेली आकारणी तातडीने रद्द करावी, 2007 ते 2013 मधील याेजनांचा फायदा अद्यापही उद्याेजकांना मिळालेला नाही, जिल्हा उद्याेग केंद्राकडून हे काम वेगाने हाेणे आवश्यक., हजाराे उद्याेजकांचे एलबीटीचे मंजुर असलेला परतावा अद्यापही दिला गेलेला नाही, ताे मिळावा, माथाडीच्या नावाखाली उद्याेजकांना ब्लॅकमेल करण्यात येत असून तातडीने यावर निर्बंध घालावा.
  • महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सचे उपाध्यक्ष, सुधाकर देशमुख - केंद्र सरकारकडून इलेक्ट्रीकल टेस्टींग लॅबचे काम सुरू आहे, मात्र ते रेंगाळले असून तातडीने ही लॅब सुरू व्हावी. कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र नाशिकमध्ये उभारण्यात यावे.
बातम्या आणखी आहेत...