आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुद्रांक शुल्क विभागाच्या दस्तनोंदणी कार्यालयातील सर्व्हर नेहमी डाऊन असतो. त्यामुळे नागरिकांना व्यवहारांसाठी दिवसदिवस ताटकळत बसावे लागते. व्यवहारासाठी बाहेरगावाहून आलेल्या लोकांचा खोळंबा होतो. त्यामुळे नाशिक विभागासाठी स्वतंत्र सर्व्हर द्यावा, अशी विनंती नरेडकोच्या वतीने राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांना करण्यात आली.
नरेडकोच्या वतीने नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी नाशिक विभागात दस्तनोंदणी कार्यालयातील कामकाजात येणाऱ्या दैनंदिन अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. दस्तनोंदणी करणारे नागरिक आपल्या कार्यालयात आल्यानंतर त्यांना सर्व्हर डाउन असल्याचे सूचित केले जाते. नागरिक सर्व्हर सुरू होण्यासाठी तासन तास ताटकळत असतात. बाहेरगावाहून सुटी टाकून आलेल्यांना अनेकदा मुक्कामी थांबावे लागते. त्यामुळे वेळेच्या अपव्ययासह आर्थिक नुकसानही सहन करावे लागते.
या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी नाशिक विभागाला स्वतंत्र सर्व्हर देण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली. दस्त नोंदणी कार्यालय सकाळी सात ते रात्री दहा या वेळेत पूर्ण क्षमतेने कार्यरत राहावीत. शनिवार व रविवारीही दस्त नोंदणी कार्यालये सुरू ठेवावीत, अशी विनंती करण्यात आली. ई-रजिस्ट्रेशन प्रणाली त्वरित पूर्ण क्षमतेने कार्यरत करावी. कर्ज वितरण करणाऱ्या बँका व फायनान्स कार्यालयांना या प्रणालीची माहिती होण्यासाठी पत्र देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेड, सचिव सुनील गवादे, जयेश ठक्कर, शंतनू देशपांडे आदी उपस्थित होते.
टीडीआरचे मूल्यांकन पूर्वीपासून मुंबई महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 25अ अंतर्गत जंगम मालमत्ता या स्वरूपात ग्राह्य धरले जात होते. जंगम मालमत्ता, टीडीआरचा दर बाजारातील मागणी व पुरवठा या सूत्राप्रमाणे नेहमी बदलत असतो. त्यामुळे यावर कुठलाही दर लावून स्टॅम्प ड्युटी लादणे गैरवाजवी व कायद्याचे उल्लंघन करणारे ठरते. यातून सर्वसामान्य नागरिकांच्या सांविधानिक अधिकारावर गदा येत आहे. त्यामुळे अवाजवी तरतूद रद्द करण्यात यावी, अशी मागणी नरेडकोच्या वतीने करण्यात आली
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.