आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअडथळेमुक्त गतिमान प्रवासाच्या उद्देशाने बनवलेल्या समृद्धी महामार्गावर काही महिन्यांपासून अपघात वाढले अाहेत. सामान्यपणे वाहनांच्या अतिवेगामुळे अपघात होत असल्याचे म्हटले जाते. मात्र समृद्धी महामार्गासारख्या वेगवान व प्रदीर्घ रस्त्यांवर वाहन चालवताना ‘रोड हिप्नोसिस’ होऊन अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा दावा मानसोपचारतज्ज्ञांनी केला अाहे.
महामार्ग सुरक्षा विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर डाॅ. रवींद्रकुमार सिंघल यांनी समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय अाणि नियोजन केले अाहे. ‘रोड हिप्नोसिस’चे कारण शोधण्यासाठी नाशिकमधील प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डाॅ. शैलेंद्र गायकवाड यांची मदत घेतली जात आहे.
दिव्य मराठी एक्सप्लेनर : प्रवासातील एकसुरीपणा व त्याच त्याच दृश्यांमुळे मनाची सजगता होते कमी
हिप्नोटिक ट्रान्स म्हणजे?
हिप्नोटिक ट्रान्स किंवा संमोहनावस्था म्हणजे आपले तर्कवितर्क करू शकणारे बाह्य मन किंवा जागृत मन निष्क्रिय होणे किंवा झोपी जाणे. एकाच प्रकारची सूचना किंवा माहिती परत-परत येत राहिली किंवा ती जर एकसुरी राहिली तर त्यावर जागृत मन तर्कवितर्क करणे सोडून देते आणि ते हळूहळू निष्क्रिय व्हायला लागते.
समृद्धीसारख्या लांब रस्त्यांवर असे घडते हिप्नोसिस
तज्ज्ञांनुसार, महामार्गावर प्रवास करताना दूरदूरपर्यंत डोळ्यांना पर्यायाने जागृत मनाला एकसुरीपणा दिसत राहतो. रस्त्यावरील पांढरे पट्टे त्यात भर टाकतात. यामुळे चालकाला संमोहनावस्था येते. परिणामी वाहनाचे नियंत्रण सुटून अपघात होतात. समृद्धी किंवा इतर कोणत्याही लांब पल्ल्यावर होणाऱ्या रोड हिप्नोसिसला कारणीभूत असलेल्या एकसुरी पॅटर्नला खंडित करण्यासाठी योजना केल्यास अपघात घटवता येऊ शकतात.
असे टाळले जाऊ शकतात अपघात
आपण जेव्हा जंगलात किंवा घाटात गाडी चालवतो तेव्हा प्रवासातील समोर येणारे वेगळेपण प्रवास आनंदी आणि सजग ठेवतो. यामुळे समृद्धीवर रस्त्याच्या कडेला अंतराअंतरावर वेगवेगळ्या अाकार-प्रकाराची झाडे लावली तर चालकाला वाहन चालवताना वेगवेगळे दृश्य दिसून जागेपणासाठी चालना मिळत राहील. तसेच मनाला चालना देणारे सचित्र बोर्ड्स लावल्यास प्रवासाचा एकसुरीपणा घालवायला मोठी मदत होईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.