आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शक्ती विकास अकॅडमीकडून जनजागृती

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शक्ती विकास अकॅडमी या बहुउद्देशीय संस्थेच्या राष्ट्रीय एकता दिन साजरा करत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १२२ वी जयंती साजरी करण्यात आली. विशेष जिल्हा न्यायाधीश दिलीप देशमुख यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

देशमुख यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष मनोहर जगताप यांनी राष्ट्रीय एकता दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी विविध उपक्रमांद्वारे नागरिकांचे प्रबाेधनदेखील करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...