आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकलहरे येथील मातोश्री कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोकुळ तळेले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एड्स राेगाबद्दचे व रूग्णाबद्दलचे गैरसमज या कार्यक्रमातून दूर करण्यात आले.दरवर्षी १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. एड्स (एचआयव्ही) हा मानवी इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसच्या संसर्गामुळे होणारा असा हा आजार आहे. या आजाराबाबत लोकांमध्ये अनेक समज आणि गैरसमज आहेत.
समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांना जागृत करण्यासाठी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. एड्सच्या रुग्णांमध्ये प्रत्येक दविशी वाढ होत आहे. जे लोक एड्स ग्रस्त आहेत, त्यांना समाजात भेदभावाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत पीडितांसोबतचा भेदभाव संपवून त्यांना सन्मान देण्यावर यावर्षी भर देण्यात आला.
एडस् आजारावर काळजी घेणे, संग्रमण हाेणार नाही यासाठी खबरदारी घेणे हाच त्यावरील उपाय असल्याचे प्रमुख मान्यवरांनी सांगितले. एड्सबाबत जनजागृती करणारे स्लाेगन झळकविण्यात आले. विद्यार्थी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.कार्यक्रमाचे आयोजन विभागप्रमुख प्रा. सचिन कापसे, डॉ. प्रीतम डुबे, प्रा. प्रवीण खामकर, प्रा. प्रशांत व्यवहारे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.