आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार राेखण्यासाठी सायकल फेरीतून जनजागृती

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय दक्षता आयाेगाकडून ‘भ्रष्टाचारमुक्त भारत- विकसित भारत’ अशी संकल्पना घेऊन या वर्षीचा जनजागृती सप्ताह साजरा केला जात असून याअंतर्गतच भ्रष्टाचाराबाबत जनजागृती करण्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने शहरात सायकलफेरी काढण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने विविध उपक्रम विभागाकडून राबविले जात आहेत.

या अंतर्गत सायकलिस्ट फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शहरात ठिकठिकाणी सायकलफेरी काढून फलकांद्वारे जागृती करण्यात आली. या फेरीत एसीबीचे माजी अधीक्षक तथा सेवानिवृत्त महानिरीक्षक हरीश बैजल, विभागाचे अधीक्षक सुनील कडासने, उपअधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार व फाउंडेशनचे अध्यक्ष किशाेर माने यांच्यासह सदस्यंनी रॅलीत सहभाग नाेंदविला.

या फेरीमध्ये फाउंडेशनच्या १०० सायकलपटूंचा समावेश होता. फेरीत भ्रष्टाचार प्रतिबंधासाठी करण्यात भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था, समाज घडविण्याबाबत घोषवाक्यांचे फलक झळकविण्यात आले होते. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून सायकलफेरी काढण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...