आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:शक्ती विकास तर्फे स्लाेगनद्वारे जनजागृती

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एड्स आणि त्याच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी नाशिक येथील शक्ती विकास अकॅडमी या संस्थेच्या वतीने तिडके कॉलनी परिसरात एड्सबद्दल जनजागृती करत एड्स दिन साजरा केला. विद्यार्थ्यांनी स्लाेगन असलेले फलक हातात घेत जनजागृती केली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोहर जगताप यांनी जगभर पसरलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल माहिती देत खबरदारीचे उपाय सांगितले. एड्सबाधित रुग्णाच्या सोबत राहणे, जेवणे, खेळणे, स्पर्श करणे, कपडे वापरणे, बाजूला झोपणे, शौचालयाचा वापर करणे या सगळ्या कारणांमुळे या रोगाची लागण होत नाही. त्यामुळे हा रोग संसर्गजन्य नाही, असे मार्गदर्शन केले. उपक्रमात संस्थेच्या सचिव मनीषा जगताप, अश्विनी बागुल, करिश्मा मुनिंद्रा, काजल आव्हाड, धनश्री पवार, दीपाली गायकवाड, गौरी भगरे, यश हिरे, ऋषिकेश गायकवाड, स्वप्निल जाधव, अथर्व जगताप आदींनी सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...