आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:जनआराेग्य समितीची विविध मागण्यांसाठी पालिकेसमाेर निदर्शने; आयुक्तांना निवेदन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये महाराष्ट्र सुश्रूषागृह नाेंदणी नियम-२०२१ नुसार रुग्ण हक्क सनद फलक, १५ बाबींचे दरपत्रक फलक आणि तक्रार निवारण कक्ष संपर्क नंबर फलक दर्शन भागात लावण्याची सक्ती करण्यासह इतर मागण्या मांडत जनआराेग्य समिती सदस्यांनी महापालिकेच्या राजीव गांधी भवनसमाेर निदर्शने करत पालिका आयुक्त डाॅ. पुलकुंडवार यांना निवेदन दिले.

महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधीत रुग्णालयांना आदेशांचे पालन करण्याच्या सूचना देऊनही त्याला केराची टाेपली दाखविली जाते, १५ सेवांचे दरपत्रक, रुग्ण हक्क सनद लावली जात नाही यासह अनेक मागण्या समितीने मांडल्या. निवेदन देतेवेळी अॅड. नाजिमाेद्दीन काझी, अॅड. नीलेश साेनवणे, कमल मते, राजेंद्र नानकर, संगीता कुमावत, पद्माकर इंगळे, शाेभा पवार, प्रभाकर पेंढारे, राकेश पाटील यांच्यासह समिती सदस्य सहभागी झाले हाेते.

बातम्या आणखी आहेत...