आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन:मराठी साहित्य संमेलनात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील 50 ग्रंथांचे प्रकाशन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रकाशन कट्ट्यात बडाेद्याच्या राजमाता शुभांगिनीराजेंच्या हस्ते होणार प्रकाशन

नाशिक जिल्ह्याचे सुुपुत्र महाराजा सयाजीराव गायकवाड हे ग्रंथ, ग्रंथकार, ग्रंथालयांचे पाेशिंदे हाेते. सुप्रशासन सामाजिक सुधारणा, न्याय, शेती उद्याेग आणि त्यांचे दातृत्व हे देशातील वेगळेपण हाेते. महाराष्ट्र शासनाने महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील साहित्याचे प्रकाशन केले आहे. बडाेदा संमेलनात त्यांच्या बारा ग्रंथांचे प्रकाशन झाले. या वर्षीच्या नाशिक येथील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ४ डिसेंबर २०२१ राेजी सकाळी ‘प्रकाशन कट्टा’वर महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावरील ५० ग्रंथांचे प्रकाशन हाेणार आहे. बडाेद्याच्या राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनातर्फे एका वेळी २० हजार पृष्ठांच्या ५० ग्रंथांचे प्रकाशन प्रथमच हाेणार आहे. यात २६ ग्रंथ मराठी, १४ ग्रंथ इंग्रजी व १० ग्रंथ हिंदी भाषेत आहेत. महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने समितीने गेल्या ३ वर्षांत २६,६४२ पृष्ठांचे ६२ ग्रंथ तयार केले आहेत. तसेच महाराजा सयाजीराव ट्रस्ट व साकेत प्रकाशनाने १०,१३० पृष्ठांचे १११ ग्रंथ व ई-बुक केले आहेत. या कामात सदस्य सचिव बाबा भांड, लेखक, संपादक, अनुवादक, मुद्रक आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या मदतीनेच हे काम हाेऊ शकले. या अक्षरधनात महाराजा सयाजीराव यांचे लेखन, भाषणे, पत्रव्यवहार, जगप्रवास, प्रशासन अहवाल हा या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा सांस्कृतिक वारसा नाशिकच्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...