आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील लघुउद्याेग भारती नाशिक शाखेतर्फे वर्ष २०२३ औद्योगिक दिनदर्शिकेचा प्रकाशन समारंभ झाला. सरकारी करभरणा तारखांचा कॅलेंडरमधे समावेश आहे. रामबंधु उद्याेगाचे अध्यक्ष हेमंत राठी, लघुउद्याेग भारतीचे अखिल भारतीय उपाध्यक्ष गोविंद लेले, नाशिकचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी, कार्यवाह निखिल तापडिया व्यासपीठावर होते.
मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ‘मानसिक आरोग्य संवर्धनातून उद्योजकता विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. व्यवसाय वाढीसाठीच्या टिप्स् मान्यवरांनी दिल्या. सूत्रसंचालन पूजा महाजन यांनी केले. निखिल तापडिया यांनी अाभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.