आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्धीचा; मनपा प्रभागनिहाय मतदार यादी जाहीर कार्यक्रम लांबला

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्धीचा शुक्रवारी (दि. १७) होणारा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांसाठी ३१ मे पर्यंतचे अद्ययावत मतदार यादी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतल्याने आता २३ जून रोजी सुधारित प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. हरकती व सूचनांनंतर ९ जुलै रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत.

ओबीसी आरक्षणविना महापालिका निवडणुका होत असून नाशिक महापालिका क्षेत्रातील ४४ प्रभागातील १३३ पैकी ६७ जागांवर महिला आरक्षण जाहीर झाले. यात अनुसूचित जातीतल्या १९ जागांवर तर अनुसूचित जमातीच्या १० जागांवर महिलांवर आरक्षण काढण्यात आले. ४४ प्रभागातील १३३ जागांपैकी ६७ जागा महिला आरक्षण जाहीर झाले असून या सर्व आरक्षण सोडतीवरील हरकती व सूचनांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान, १७ जून रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार होत्या. मात्र ३१ मे पर्यंतची कट ऑफ डेट गृहीत धरून, मतदार यादी अंतिम करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिले आहे. यापूर्वी ५ जानेवारी २०२२ पर्यंतची मतदार यादी अंतिम करण्यात आली होती. यामुळे यापूर्वी तयार केलेल्या मतदार याद्यांची नव्याने दुरुस्ती केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...