आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्षिक सभेत आक्षेप:नाेटा बदलणाऱ्यांची नावे करा जाहीर; जिल्हा बँक सभेत मागणी

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या ८ नाेव्हेंबरला नाेटबंदीचा निर्णय जाहीर हाेऊन ६ वर्ष पूर्ण हाेतील. मात्र नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अजूनही त्याचे कवित्व सुरूच आहे. संस्थेची आर्थिक दुरवस्था नाेटबंदीत पाेत्या-पाेत्याने काहींनी नाेटा बदलल्यामुळे झाली असून अशा अवैध रितीने नाेटा बदलणाऱ्यांची यादी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करा. थकबाकीदार शेतकऱ्यांच्या नावाचे फलक बँक लावते तसेच नाेटा बदलणाऱ्यांचेही लावा, अशी जोरदार मागणी सभासदांनी जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.

संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर प्रशासक अरुण कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही पहिलीच सभा हाेती. व्यासपीठावर सीईआे एस. एन. पिंगळे व विभागप्रमुख उपस्थित हाेते. कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय दाेनने वाढवून ६० वर्ष करणे, थकबाकी वसुलीसाठी ठेवीदाराच्या कुठल्याही खात्यातून रक्कम वळती करणे, हे ठराव मंजूर झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. निसाका व नासाकावर बँकेचेच संचालक असताना ते ताेट्यात व बंद कसे पडले? असा प्रश्न सभासदाने येथे उपस्थित केला. शिरीषकुमार काेतवाल, राजेंद्र भाेसले, राजेंद्र डाेखळे यावेळी उपस्थित हाेते.

एनपीए आणला २९ टक्क्यांवर बँकेने जर रिझर्व्ह बँकेच्या रेशाेचे नियम पाळले नाही तर परवानादेखील रद्द हाेऊ शकताे. दाेनदा मदतीसाठी प्रस्ताव पाठविला. मात्र, जर कर्ज येणे १०० टक्के हाेत असेल तर शासन का मदत करेल? आता कठाेर पावलांमुळे थकबाकी ९६ वरून ७७ टक्के तर निव्वळ एनपीए ५१ वरून २९ टक्के करण्यात यश आल्याचे प्रशासक कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.

पैसे आल्यावर ठेवी नक्की देणार जिल्ह्यातील ४४ नागरी सहकारी बँकांच्या ११० काेटींच्या ठेवी जिल्हा बँकेत आहेत. येवला मर्चंट, जनलक्ष्मी बँकेला तातडीने त्या न मिळाल्यास त्या अडचणीत येतील याकडे नागरी सहकारी बँक्स असाेसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, अजय ब्रह्मेचा यांनी लक्ष वेधले. वसुली झाल्यावर ठेवींच्या १० टक्के रकमा परत देऊ, असे यावेळी प्रशासकांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...