आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळसूत्र चोरी:बसमधून उतरताना मंगळसूत्र खेचले

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाचे बसमधून उतरताना मंगळसूत्र चोरी करण्यात आले. सोमवारी (दि.१५) रोजी रात्री ८.१५ वाजता ठक्कर बाजार येथे हा प्रकार घडला. सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयित चाेरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि समृद्धी जोशी रा.डो‌ंबिवली, मुंबई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुंबई बसमधून प्रवास करत ठक्कर बस स्थानकाच्या समोर गाडीतून उतरत असताना गर्दीचा फायदा घेत चोराने गळ्यातील ७० हजारांचे मंगळसूत्र चोरी केले. वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...