आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हद्द वाद:हद्द वादात बसस्थानकच पंक्चर; स्थानकभर बसच्या रांगा लागल्याने प्रवाशांना तीन तास ताटकळत बसावे लागले

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठक्कर बझार बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच बसचे टायर पंक्चर झाले. दुरुस्तीबाबत तक्रार करणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यास मात्र नाशिक -१ व नाशिक-२ या डेपोंच्या फेऱ्या माराव्या लागल्या. दरम्यानच्या काळात बसस्थानकच कोंडीमुळे पंक्चर होत गेले. स्थानकभर बसच्या रांगा लागल्याने प्रवाशांना तीन तास ताटकळत बसावे लागले.

यावल डेपोची यावल ते कल्याण या मार्गावरील बस (एमएच २० बीएल ३३९९) दुपारी ११ वाजता स्थानकात पोहोचली. थाेड्या वेळाने प्रवाशांना घेऊन निघताना स्थानकाच्या प्रवेशद्वारीच तिचे टायर पंक्चर झाले. बस दुरुस्तीबाबत संबंधित कर्मचाऱ्यांनी नाशिक-१ डेपोमध्ये संपर्क साधला.

मात्र हे आमच्या हद्दीत नसल्याने तुम्ही नाशिक-२ मध्ये जा असे सांगण्यात आले. वाहक नाशिक-२ डेपोत पोहोचला. तर ते आमच्याकडे नाही. तुम्ही नाशिक-१कडेच जा असे तिथून सांगण्यात आले. तोपर्यंत स्थानकात कोंडी वाढली होती. अखेरीस तीन तासांनंतर पंक्चर बसचे टायर बदलण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...