आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम सेंटरमध्ये मदत घेतात सावध व्हा:महिलेला मदत करण्याचा बहाण्याने फसवले; कार्ड बदली करत घातला गंडा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एटीएममध्ये मदत घेतांना सावध रहा अशा प्रकारे एका महिलेला नवीन एटीएम कार्डचा पिनकोड जनरेट करण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करत कार्डचा पिन नंबर बघून घेत कार्ड अदला बदल करत महिलेच्या बँक खात्यात 23 हजार रुपये ऑनलाईन काढून घेत फसवणूक करण्यात आली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या द्वारका शाखेत हा प्रकार उघडकीस आला. रविवार दि.5 रोजी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी झाली फसवणूक

पोलिसांनी दिलेली माहिती आणि अर्चना रोकडे रा. नागजी चौक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नविन एटीएम कार्ड आले आहे. कार्ड घेऊन द्वारका येथील एटीएम केंद्रात पिन कोड जनरेट करण्यासाठी गेल्या होत्या. याठिकाणी पहिलेच एक तरुण उभा होता. मी बँकेचा प्रतिनिधी आहे.

पिनकोडच्या बहाण्याने कार्ड लंपास

तुम्हाला पिन कोड जनरेट करण्यासाठी मदत करु का असे त्याने सांगीतले. महिलेने कार्ड संशयित तरुणाकडे दिले. त्याने पिन कोड माहिती करुन पैसे काढून दिले. कार्ड परत देतांना दुसरेच कार्ड परत दिले. काही वेळाने बँक खात्यातून 23 हजार रुपये ऑनलाईन काढून घेतल्याचा मोबाईल वर मेसेज आला. कार्ड पाहिले असता दुसऱ्याच व्यक्तीचे कार्ड असल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ निरिक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...