आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुरिअरचा पत्ता चुकला अन् 2.76 लाखही गेले!:पत्ता अपडेटसाठी डाॅक्टरने 5 रुपये ऑनलाईन भरले, अँप डाऊनलोड करताच भामट्याचा गंडा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कुरीअरचा पत्ता चुकल्याचे सांगत पत्ता अपडेट करण्यासाठी 5 रुपये ऑनलाईन भरण्यासाठी अ‌ॅप डाऊनलोड करण्यास सांगून पिन नंबर घेत डाॅक्टरच्या फोन पे लिंक असलेल्या तीन बँक खात्यातून 2 लाख 76 हजार रुपये ऑनलाईन काढून घेत फसवणूक केल्याप्रकरणी संशयितांच्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

काॅल आला अन्..!

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि डाॅ. सुदर्शन पवार रा.शरणपुररोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एका कंपनीचा मोबाईल खरेदी केला आहे. हा मोबाईल नादुरुस्त झाल्याने एका कुरीअर कंपनीमार्फत मोबाईल बंगळुरू येथे मोबाईल कंपनीच्या सर्विस सेंटरला पाठवला होता. कुरीअर केल्यानंतर दोन दिवसांत डाॅ.पवार यांना अनोळखी नंबरहून फोन आला.

फोन वापरकर्त्याने मी संबधीत कुरिअर कंपनीतून मनिष शर्मा बोलत असल्याचे सांगीतले. तुम्ही पाठवलेले कुरीअर पार्सलवरील पत्ता चुकीचा असल्याचे सांगीतले. पत्ता अपडेट करण्यासाठी प्रोसेसिंग फि म्हणून 5 रुपये ऑनलाईन भरावे लागले असे सांगीतले.

असा घातला ऑनलाईन गंडा

डाॅ. पवार यांना विश्वास पटल्याने त्यांनी संशयिताला प्रतिसाद दिला. संशयित मोबाईल धारकाने लिंक पाठवली. डाॅ. पवार यांना लिंक वरील अ‌ॅप डाऊनलोड केले. ऑनलाईन पेजवर युपीआय पीन नंबर देण्यास सांगीतला. डाॅ. पवार यांनी पिन नंबर दिल्यानंतर फोन पे खात्याशी लिंक असलेल्या एसबीआय, कोटक महिंद्र, पंजाब नॅशनल बँक या बँक खात्यातून युपीआयद्वारे 2 लाख 76 हजार ऑनलाईन दुसऱ्याच खात्यावर वर्ग केले. मोबाईलवर पैसे काढल्याचा मेसज आल्यानंतर फसवूक झाल्याचे लक्षात आले. वरिष्ठ निरिक्षक सुरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

कुरीअर लिंक बोगस

संशयिताने कुरीअर ची बोगस लिंकच्या अधारे बोगस लिंक पाठवत पत्ता चुकीच्या असल्याचे भासवत अ‌ॅप डाऊनलोड करण्यास सांगीतले. कुठलेही अ‌ॅप डाऊनलोड करण्यापुर्वी ते अधिकृत असल्याची खात्री करा जेणेकरुन फसवणूक टाळली जाऊ शकते असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...